Sunday, May 24, 2009

कोम्ब एकटा होता....

कापला बुंधा तरी
कोम्ब एकटा होता
मूळ गेले अंतरी
धरेत गारवा होता.....

निष्पर्ण ही काया परी
देह झाकला होता
अवकाश रिक्त झाले
अंधार साचला होता....

नाते स्मरे धरेला
दाटून थेम्ब झरला
कापला बुंधा तरी
कोम्ब थांबला होता.....

2 comments:

  1. कापला बुंधा तरी कोंब थांबला होता. सुरेख.

    ReplyDelete