Friday, April 24, 2009

मी बळी तो बळी...

मी बळी तो बळी
कोळ्याची जाळी
नागवे पोर शोधी
अडकलेली मासोळी....

अनंत धागे
अनंताचा जीव
जाळ्यातला मासा
पाकोळी पाकोळी.....

नात्यांचे धागे
जाळ्याचे धागे
तगमग कशाची
नेभळी नेभळी....

जळी तोच
स्थळी तोच
तर्हा त्याची
वेगळी वेगळी.....

1 comment:

  1. अतिशय सुरेख! शब्दनिवड अप्रतिम.

    ReplyDelete