Tuesday, October 25, 2011

अज्ञात अधांतरी..

मिट्ट काळोख्या अंधारी
पिल्ले थांबलेली चारी,
नभ बेभान कोसळे
पाडसांच्या पाठीवरी


अर्ध्या भयाण राती
रात किड्यांची अंगाई,
माय शोधण्या निवारा
रस्ता ओलांडून जाई


ओलेचिंब झाले रान
वेडी भीतीने शहारी,
प्राण आणून नेत्रात
माय आठवते उरी


भूत तसेही नव्हते त्यांची
भविष्येही थांबली,
माय नसे ज्यांची त्यांना
नित्य यम-सावली


प्रहर दोन उमटला
मरणाकांत ध्वनी,
माय आता कधी न परते
पिले उमजती मनी


दोष कुणाचा बळी कुणाचा
प्रश्न चित्तान्तरी,
अनाथ पोरकी पिले चालती
अज्ञात अधांतरी


मिट्ट काळोख्या अंधारी
पिल्ले थांबलेली चारी
अनाथ पोरकी पिले चालती
अज्ञात अधांतरीNo comments:

Post a Comment