Sunday, May 1, 2011

चौफुला २०११ - काव्य संमेलन - शिकागो - जुलै २०११

नमस्कार मंडळी, बृहन महाराष्ट्र मंडळाचे द्वैवार्षिक अधिवेशन जुलै २०११ मध्ये शिकागो येथे होत आहे.. त्याचा एक भाग म्हणून अमेरीका आणि कॅनडा येथील कवी-कावायात्रींसाठी एक खास काव्य संमेलन आयोजित केले आहे..
कार्यक्रमाचे नाव "चौफुला २०११" असे असून बृहन महाराष्ट्र मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्याची अधिक माहिती उपलब्ध आहे..

तेव्हा तुम्ही जर अमेरिका किंवा कॅनडा मध्ये राहत असाल, तर हि एक उत्तम संधी आहे तुमचे काव्य सादर करण्याची..आणि अर्थात तुमची कविता ऐकायला उत्सुक असेल जग भरातील सुजाण आणि साहित्य प्रेमी श्रोतृवर्ग!!

तेव्हा घ्या हाती लेखणी आणि लिहा एखादा फर्मास पोवाडा, नाहीतर एखादी गवळण किंवा लावणी!! आणि द्या पाठवून chaufula@gmail.com या पत्त्यावर..

1 comment:

  1. वाह! असे सुंदर उपक्रम महाराष्ट्राच्या बाहेर किंबहुना परदेशाच्या मातिवर सुरू आहेत हे वाचून खुप बरे वाटले! तुमच्या उपक्रमाला खुप-खुप शुभेच्छा!!

    ReplyDelete